Pune: पुण्यात उद्यापासून ७ दिवस मिनी लॉकडाऊन

पुण्यात उद्यापासून ७ दिवस मिनी लॉकडाऊन (Pune Mini Lockdown).

पुणे : पुण्यात उद्यापासून ७ दिवस मिनी लॉकडाऊनची घोषणा (Pune Mini Lockdown). निर्बंध कडक करण्याचा निर्णय.

आज शुक्रवार, दिनांक २ एप्रिल २०२१ ला, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजित (दादा) पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याचा आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली.

या बैठकीमद्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, खासदार, आमदार, पुणे व पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त, दोन्ही मनपा महापौर, दोन्ही मनपा पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, पुणे ग्रामीण एसपी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने प्रशासनाने आता ठोस पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून संचारबंधीही सुरु केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्बंध कडक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

उद्या पासून म्हणजे ३ एप्रिल २०२१ पासून पुढील ७ दिवस हे निर्बंध लागू होतील. पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये निर्बंध कडक.

काय चालू असणार व काय बंद राहणार हे पाहू.-

काय चालू असणार

१. औद्योगिक कंपन्या सुरु राहणार.

२. अत्यावश्यक सेवा सुरु.

३ . दहावी, बारावी, व MPSC च्या परीक्षा नियोजित वेळेमध्ये होणार.

४. लग्न सोहळ्यासाठी फक्त ५० लोकांची उपस्थित परवानगी.

५.अंत्यसंस्कार विधीसाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

६ . हॉटेल, रेस्टोरंट मधील पार्सल सेवा सुरु राहणार.

७. वृत्तपत्र संचारबंदी नियमातून वगळले

८. कंपनीतील कर्मचाऱ्यांना ने-आन करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करू शकतील.

काय बंद राहणार हे पाहू.-

१.अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी

२. दिवसा जमावबंदी

३. आठवडे बाजार बंद

४. हॉटेल, बार, रेस्टोरंन्ट बंद असणार (होम डिलेव्हरी  सुरु राहणार)

५. सिनेमा गृह, मॉल, व्यायामशाळा, स्विमिंग पूल बंद राहतील.

६. ८ दिवस पी.एम.पी.एल सेवा बंद

७. धार्मिक स्थळे बंद राहणार

८. सर्व सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी असणार

९. शाळा व महाविद्यालये ३० एप्रिल २०२१ पर्यंत बंद

हे सर्व निर्बंध पुणे शहर,पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात लागू होणार आहेत. उद्यापासून या सर्व निर्बंधांची अंमलबजावणी होणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: