Pune Corona Update 3 April 2021: पुणे महापालिका हद्दीत नव्याने 35 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

Pune Corona Update 3 April 2021: पुणे महापालिका हद्दीत नव्याने 35 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

पुणे : Pune Corona Update 3 April 2021 – शनिवार, दिनांक ३ एप्रिल २०२१ रोजी. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

आज पासून पुण्यामध्ये निर्बंध कडक लादले गेले आहेत. सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केली गेली आहे. तर दिवसा जमावबंदी.

वाढत्या कोरोना बाधित रुग्ण संख्येमुळे प्रशासनाने आता पुण्यात मिनी लॉकडाऊन ( Mini  Lockdown) केला आहे. व निर्बंध कडक केले आहेत.

शनिवार, ३ एप्रिल २०२१ पुणे शहर कोरोना अपडेट

नवे रुग्ण : आज ५ हजार ७२० नवे रुग्ण सापडले आहेत, एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या (२ लाख ८३ हजार ८१९) झाली आहे.

कोरोना चाचण्या: २० हजार ०६६ लोकांच्या आज पुण्यामध्ये कोरोना चाचण्या घेतल्या आहेत.

एकूण (१५ लाख ३९ हजार ८५३) कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

कोरोनामुक्त : दिवस अखेर ३,२९३ लोक कोरोनामुक्त झाली आहेत. तर एकूण (२ लाख ३८ हजार ८९०) लोक कोरोनामुक्त झाली आहेत.

उपचार सुरु : ३९ हजार ५१८ कोरोना बाधित रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत.

गंभीर रुग्ण संख्या : ६३७ रुग्ण गंभीर ( व्हेंटिलेटर वर ) असल्याची नोंद.

पुणे शहरामध्ये एकूण ३९ हजार ५१८ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत,

त्या रुग्णांपैकी ६३७ रुग्ण हे गंभीर अवस्थेत (व्हेंटिलेटर) वर आहेत आणि ३ हजार ७४३ कोरोना बाधित रुग्ण ऑक्सिजन वर आहेत.

मृत्यू : दिवसभरात नव्याने ३५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवार , दिनांक. ३ एप्रिल २०२१ ला झाली आहे.

तर कोरोना बाधित रुग्णांच्या मृतांची एकूण संख्या ५, हजार ४११ एवढी नोंद झाली आहे.

तर महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आढळत आहे.

प्रशासनाने आता मोठ्या प्रमाणात लसीकरणावर सुद्धा जोर दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: