Pune Corona Update: 29 March पुणे महापालिका हद्दीत नव्याने २४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद

Pune Corona Update: पुणे महापालिका हद्दीत नव्याने २४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद (२९ मार्च २०२१)

Pune Corona Update: पुणे महापालिका हद्दीत नव्याने २४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद (२९ मार्च २०२१).

कोरोना संसार्गाने देशात पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. वाढत्या कोरोना संसार्गामधील ठिकाणांमध्ये पुणे येथे रुग्ण संख्या खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहे.

पुणे महापालिकाच्या हद्दीमध्ये सोमवार, २९ मार्च २०२१ च्या दिवस अखेर ऐकून नवीन २४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

२९ मार्च २०२१ च्या पुणे कोरोना अपडेट नुसार

नवे रुग्ण : दिवसभरात २,५४७ नवे रुग्ण सापडले आहेत,

कोरोनामुक्त : २,७७१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत व डिस्चार्ज  मिळाला आहे.

कोरोना चाचण्या: १५,१५३ लोकांच्या आज चाचण्या झाल्या आहेत.

उपचार सुरु : एकूण ३२,८७५ कोरोना रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत.

मृत्यू : दिवसभरात एकूण २४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद २९ मार्च २०२१ ला झाली आहे.

गंभीर रुग्ण संख्या : ६७४ रुग्ण

तर आतापर्यंत आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५,२४२ इतकी नोंद झाली आहे.

पुणे शहरामध्ये ३२,८७५ रुग्ण उपचार घेत आहेत, त्या रुग्णांपैकी ६७४ रुग्ण गंभीर आहेत व २ हजार ८८० कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन द्वारे उपचार सुरु आहे.

कोरोना बाधितांची वाढती संख्या दिवसं दिवस चिंताजनक होत चालली आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने पुणे महानगर पालिका हद्दीमधील सर्व खाजगी दवाखान्यामधील ८०% बेड्स हे कोविड रुग्णांच्या उपचारास उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले गेले आहेत.

३१ मार्च २०२१ पासून खाजगी दवाखाण्यामधील ८० % बेड्स हे कोवीड रुग्णांसाठी उपलब्ध होतील. अशी माहिती पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: