पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohol)यांनी लागू केले नवीन निर्बंध

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ) यांनी लागू केले नवीन निर्बंध

पुणे | राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी शहरात नवीन निर्बंध लागू केले आहेत.

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्येमुळे सरकारने काही निर्बंध लागू केले होते.

त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, आपले हात स्वच्छ धुणे. इत्यादी नियमांचा समावेश होता.

मात्र तरीही फेब्रुवारी पासून कोरोना रुग्णाची संख्या हळूहळू वाढायला सुरुवात झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोरोना (Corona)बाधितांची आकडा वाढताना दिसत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगपालिकेने शहरातील कोरोनाचा वाढत असणारा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत खूप निर्बंध लावले देखील होते.

पुणे महानगपालिकेकडून पुण्यातील सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याचेही आव्हान देखील करण्यात आले होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत नविन निर्बंध लागू केले आहेत.

त्यांनी नविन नियम याची सर्व माहिती ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट करुन नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयन्त केला .

नविन नियम काय आहेत ते पहा –

१. पुणे (Pune)महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम हे संपूर्ण पणे बंद राहतील.

२. महानगरपालिका क्षेत्रामध्ये होणारे लग्नसमारंभ कार्यक्रम हे फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत करावेत अशी सूचना दिली गेली.

३.अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या संबधीत सर्व विधी हे फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्येच करण्यास परवानगी असणार .

४. महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणारे सर्व कार्यालय (आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळता ) ५० % कर्मचाऱ्यांसह कार्यरत ठेवण्यात येतील. शक्य झाल्यास ‘कर्मचाऱ्यांना ‘घरूनच काम करण्याचा (Work from home) पर्याय द्यावा .

अशा प्रकारचे नविन निर्बध पुणे महापौरांनी लागू केले आहेत. श्री. मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती ट्विटर अकाऊंट च्या माध्यमातून दिली आहे.

तसेच सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन (Lockdown)करण्याचा विचार नाही.

जर पुण्यातील नागरिकांची साथ कुठेतरी कमी पडली तर मात्र लॉकडाऊन करवंच लागेल, असंही पुणे शहराचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ म्हटले आहेत .

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: