मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण (Chhagan bhujbal)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांना कोरोनाची लागण.

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मंत्री छगन भुजबळ(Chhagan  bhujbal) यांना कोरोनाची लागण. छगन भुजबळ हे राज्याचे अन्न पुरवढा व नागरी संरक्षण मंत्री आहेत.

मागच्या काही दिवसात कोरोना ने पुन्हा एकदा राज्यात आपला डोकं वर काढला, राज्यात आणि देशात खूप मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढू लागले.

कोरोना लागण झाल्याची बातमी स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटर च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवले.

त्यांनी ट्विटर माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (corona  positive)आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.

माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.”

छगन भुजबळ हे गेल्या दोन – तीन दिवसांमध्ये काही लोकांच्या संपर्कात आले होते त्यांना ट्विटर वर आपली कोरोना चाचणी करून घेण्याची सूचना ट्विटर माध्यमातून दिली .

तसेच त्यांनी नाशिक शहरामध्ये सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२१. संचारबंधी लागू करण्याची घोषणा या दरम्यान केली.

नाशिक शहरामध्ये होणाऱ्या संचार बंदीचा वेळ हा रात्री ११ पासून ते सकाळी ५ पर्यंत असेल.

या संचारबंधीचे पालन न करणाऱ्यावर व विना मास्क कोणी आढळले त्या १००० रुपये दंड व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

मंत्री छगन भुजबळ हे कोरोना लागण होण्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर एका लग्न समारंभात राष्ट्रवादी पार्टीतील अनेक नेत्यांसोबत उपस्थित राहिले होते.

त्यामध्ये पार्टीमधील काही दिग्गज नेत्यांचाही समावेश होता.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: