INDvsENG :भारत ६६ धावांनी विजयी, शिखर धवन ची शानदार खेळी

INDvsENG :भारत ६६ धावांनी विजयी, शिखर धवन ची शानदार खेळी

पुणे | INDvsENG ODI  :भारत ६६ धावांनी विजयी, शिखर धवन ची शानदार खेळी.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम पुणे येथे आज दिनांक २३ मार्च २०२१ ला भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवशीय सामना पार पडला.

या मध्ये भारतीय संघाचा ६६ धावांनी विजय झाला.

इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.


भारतीय संघ फलंदाजी :

ओपनिंग साठी भारताची सलामीवीर जोडी रोहित शर्मा व शिखर धवन मैदानात उतरले. पहिल्या विकेटसाठी त्यांनी ६५ रणांची भागीदारी केली.

रोहित शर्मा ४२ चेंडू मध्ये २८ धावा करून बाद झाला, तर त्याने ४ चौकार सुद्धा लावले.

कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला, व शिखर सोबत त्याची चांगली भागेदारीही झाली.

विराट कोहलीने आपले अर्धशतही बनवले, परंतु ३२.१ ओव्हरीला विराट ६० चेंडू मध्ये ५६ धावा करून बाद झाला, ६ चौकार त्याने लावले.

कोहलीनंतर मैदानात श्रेयश अय्यर उतरला परंतु अवघ्या ६ धावा करून त्याला परतावा लागला.

पाचव्या क्रमांकावर के. एल. राहुल फलंदाजी साठी उतरला, दुसऱ्या बाजूने शिखर धवनने मैदानावर आपला कब्जा मिळवला होता.

शिखर धवन ३८.१ ओव्हर ला १०६ चेंडू मध्ये ९८ धावा करून बाद झाला, ११ चौकर व २ षटकार अशी उत्कृष्ट खेळी त्याने आज दाखवली.

हार्दिक पांड्या १ रन करून आऊट झाला.

सातव्या स्थानावर कृणाल पांड्या उतरला , व राहुल व कृणाल पांड्या दोघांनी अर्धशतके केली.

के एल राहुल नाबाद ६२ (४३ ) रन ४ चौकार, ४ षटकार

कृणाल पांड्या ५८ (३१ ) रन ७ चौकार २ षटकार ,

अशी अप्रतिम फलंदाजी करत भारतीय संघाची धावसंख्या ३१७/५ (५० ओव्हर ) पर्यंत पोहचली .

रोहित शर्मा २८ (४२) धावा, विराट कोहली ५६ (६०), श्रेयश अय्यर ६(९ ), के. एल. राहुल- ६२* (४३ )रन (नाबाद) , हार्दिक पांड्या १, कृणाल पांड्या ५८ *(३१ )

इंग्लंड गोलंदाजी – स्टोक्स ३ विकेट, मार्क वूड २ विकेट.

भारतीय संघ ३१७/५ (५० ओव्हर )


INDvsENG ODI

इंग्लंड संघ फलंदाजी :

जेसोन रॉय व जॉनी बैरस्टोव इंग्लंड संघातुन ओपनिंग साठी उतरले, दोघांनीही उत्कृष्ठ फलंदाजी केली.

जेसोन रॉय ४६ ( ३५ ) धावा ७ चौकार १ षटकार ,

जॉनी बेरस्टोव ९४ (६६ ) धावा ६ चौकार ७ षटकार ,

स्टोक्स १ (११ ), मॉर्गन २२ (३०) धावा ४ चौकार , बट्ट्लर २(४ ), बिल्लीन्ग्स १८ (२२) १ चौकार , एम अली ३०(37 ) 2 चौकार १ षटकार ,

S  curran १२ ( २० ) १ चौकार , T curran ११ (१६ ) १ चौकार, रशीद 0 (5), एम वूड २(७ )

इंग्लंड २५१ /१० (४२.१)

भारत गोलंदाजी : पी. कृष्णा ४ विकेट, एस ठाकूर ३, भुवनरेश्वर कुमार २ , कृणाल पांड्या १ विकेट.

भारतीय संघ ६६ धावांनी विजयी.

प्लेअर ऑफ थे मॅच – शिखर धवन (भारत) – ९८ (१०६ ) धावा

भारतीय संघ वने डे मध्ये १-0  ने आघाडीवर.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: