India vs England 4th T20 2021,भारताची इंग्लंडवर ८ धावांनी मात,मालिकेत २-२ ने बरोबरी

India vs England 4th T20 2021, भारताची इंग्लंडवर ८ धावांनी मात, मालिकेत २-२ ने बरोबरी

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : India vs England 4th T20 2021, भारताची इंग्लंडवर ८ धावांनी मात, मालिकेत २-२ ने बरोबरी, सूर्यकुमार यादव यांचे अर्धशतक.

इंग्लंड सोबत T20  मालिकेतील चौथा सामना १८ मार्च २०२१ ला अहमदाबाद येथे खेळाला गेला.

या सामन्यांमध्ये टीम इंग्लंड ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

५ मॅचच्या T20  मालिकेत टीम इंडिया व इंग्लंड यामध्ये आता 2-2 ने बरोबरी झाली.

प्रथम फलंदाजी करत असताना भारतीय टीम चा स्कोर १८५ /८ ( २० ) झाला .

सुरुवातीला टीम इंडिया चे प्रदर्शन काही खास नाही दिसले कारण टीम चे प्रमुख बॅट्समन रोहित शर्मा १२ (१२ ), के एल राहुल १४ (१७ )

तर कप्तान विराट कोहली १(५) धावा करून आउट झाले.

टीम इंडिया मधून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव याने सर्वाधीक ५७ रन्स ३१ बॉल मध्ये बनवले, यामध्ये ६ चौकार, ३ षटकार समाविष्ट आहेत.

सूर्यकुमार यादवला मुख्य साथ दिली रिषभ पंतने. परंतु १३.४ ओव्हर ला टीम चे ११० रन झाले असताना सूर्यकुमार यादव आऊट झाला.

रिषभ पंत ३० (२३ ) रन करून आऊट झाला. त्यामध्ये त्याने ४ चौकार सुद्धा लावले.

श्रेयश अय्यर ने १८ चेंडू मध्ये ३७ रन्स बनवले त्यामध्ये त्याने ५ चौकार व १ षटकार लावला.

हार्दिक पांड्या ११ (८ ), शार्दूल ठाकूर १०* (४ ), वॉशिंग्टन सुंदर ४(२ )असा स्कोर टीम इंडियाने केला.

इंग्लंड गोलंदाजी – Jofra Archer ने ४ विकेट घेतल्या. Sam curran, Ben stokes , Adil Rashid व Mark  wood यांनी प्रत्येकी १ विकेट्स मिळवल्या,  

टीम इंग्लंड समोर १८६ रन्स चे आव्हान.

India vs England 4th T20 2021

इंग्लंड फलंदाजी

टीम इंग्लंड मधून फलंदाजी करताना बेन स्टोकेस याने सर्वाधीक ४६ रन्स, २३ चेंडूंमध्ये बनवले,

तर ओपनर जेंसोन रॉय ४0 (२७), जॉनी बैरस्टोव २५ (१९ ) रन करून आऊट झाले.

टीम इंग्लंड चा स्कोर – १७७ / ८ (२० ओव्हर ) झाला.

इंडिया टीम ने गोलंदाजी करतं असताना शार्दूल ठाकूर ( Shardul  thakur) ३ विकेट्स, राहुल चाहर व हार्दिक पांड्या प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या.

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) ला आज एक विकेट मिळाली .

टीम इंडिया ने ८ रन्स ने ही मॅच जिंकली. या मालिकेत दोन्ही टीम्स ची २-२ ने बरोबरी झाली.

प्लेअर ऑफ द मॅच – सूर्यकुमार यादव .

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: