INDvsENG 3rd ODI: भारत ७ धावांनी विजयी, २-१ ने जिंकली मालिका

INDvsENG 3rd ODI: भारत ७ धावांनी विजयी, २-१ ने जिंकली मालिका

पुणे | INDvsENG 3rd ODI:भारत ७ धावांनी विजयी, २-१ ने जिंकली मालिका , सॅम करन ची झुंजार खेळी.

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना रोमांचक ठरला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघांमद्ये अटीतटीचा सामना झाला.

आठव्या स्थानावर उतरलेल्या इंग्लंड संघातील अष्टपैलू खेळाडू सॅम करन याने ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत पोहचवली व नाबाद ९५* (८३ ) धावा केल्या.

पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वर आज शनिवार,दिनांक २८ मार्च २०२१ ला भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा दिवशीय सामना खेळला गेला.

या सामन्यांमध्ये भारतीय संघ ७ धावांनी विजयी झाला.

यावेळेस सुद्धा इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संघ फलंदाजी

आज ओपनिंगसाठी भारताची सलामीवीर जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. व खेळाला अप्रतिम सुरुवात करून दिली;

या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली.

रोहित शर्मा ने ३७ चेंडू मध्ये ३७ धावा केल्या, तर त्याने 6 चौकार लावले. इंग्लंड गोलंदाज आदिल रशीदच्या चेंडूवर (१४.४ ओव्हर ) रोहित शर्मा बाद झाला.

रोहित नंतर कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला,

शिखर धवन १६.४ ओव्हर ला ५६ चेंडू मध्ये ६७ धावा करून बाद झाला, १0 चौकर मारले.

फलंदाजीसाठी चौथ्या स्थानावर रिषभ पंत उतरला व आज आज सुद्धा त्याने आक्रमक खेळी केली.

विराट कोहली १७.४ ओव्हर ला ७ (१० ) धावा करून बाद झाला. १ चौकार त्याने मारला.

के एल राहुल ७ (१८) धावा करून बाद झाला.

हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनी एक उत्कृष्ट भागेदारी करत भारतीय संघाला चांगली धाव संख्या बनवून दिली.

रिषभ पंत ने आज भारतीय संघातून सर्वाधिक ७८ (६२) धावा बनवल्या. ५ चौकार ४ षटकार त्याने मारला. व बाद झाला.

हार्दिक पांड्या ने ६४ (४४) धावा केल्या. हार्दिक ने ५ चौकार ४ षटकार मारले.

शार्दूल ठाकूर ३० (२१) धावा, १ चौकार ३ षटकार शार्दुलने मारले. कृणाल पांड्या २५ (३४ ) धावा.

भुवनेश्वर कुमार ३ (५ ) , प्रसिद्द कृष्णा 0 (३ ) , नटराजन नाबाद 0 (0) धावा.

इंग्लंड गोलंदाजी

मार्क वूड ३ विकेट, आदिल रशीद २ विकेट,

स्टोक्स, सॅम करन , एम अली, आर टॉपलेय , लिविंगस्टोन यांना प्रत्येकी १-१ विकेट्स मिळाल्या.

भारत ३२९ /१० (४८.२)

इंग्लंड संघ फलंदाजी :

जेसोन रॉय १४ ( ६ ) धावा ३ चौकार, जॉनी बेरस्टोव १ (४) धावा,

स्टोक्स ३५ (३९) धावा ४ चौकार १ षटकार,

डी. मलान ५० (५०) धावा. ६ चौकार.

बट्ट्लर १५ (१८) धावा २ चौकार. लिविंगस्टोन ३६ (३१) ६ चौकार १ षटकार. एम अली ३० (३७) 2 चौकार १ षटकार. आदिल रशीद १९ ( २२ ) धावा २ चौकार. एम वूड १४ (२१ ) धावा १ चौकार. आर टॉपलेय १*(१ )

सॅम करन नाबाद ९५* (८३ )धावा, ९ चौकार ३ षटकार.

इंग्लंड ३२२/९ (५०)

भारत ७ धावांनी विजयी, २-१ ने जिंकली मालिका

प्लेअर ऑफ द मॅच – सॅम करन ९५* (८३ )धावा

प्लेअर ऑफ द सिरीज – जॉनी बेरस्टोव

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: