कोरोना, लॉकडाऊन व MPSC परीक्षा बद्दल मुख्यमंत्री ठाकरे(Udhhav Thackeray)काय म्हटले पहा

कोरोना, लॉकडाऊन व MPSC परीक्षा बद्दल मुख्यमंत्री ठाकरे(Udhhav Thackeray)काय म्हटले पहा

मुंबई : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी कोरोना (corona ), लॉकडाऊन (lockdown) व MPSC  EXAM बद्दल लाईव्ह येऊन जनतेशी संवाद साधला.

राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी corona, lockdown व MPSC परीक्षा बद्धल सूचना केल्या. MPSC  EXAM  बद्दल ते काय म्हटले ते पाहू.

MPSC परीक्षा

१४ मार्च ला MPSC परीक्षा ही होणार होती, परंतु Corona च्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. विध्यार्थ्यांच्या झालेल्या गैरसोईमुळे मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

कधी होणार MPSC परीक्षा ?

परीक्षेबद्दल मुख्यमंत्री ठाकरे म्हटले कि MPSC परीक्षा ही याच ७-८ दिवस मध्ये होईल, व त्याबद्दल तारीख ही उद्या म्हणजे १२ मार्च ला जाहीर होईल,

अश्या सूचना त्यांनी मुख्य सचिवांना व MPSC  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत .

होणारी MPSC परीक्षेची ची तारीख येत्या आठ दिवसांमधली असेल.

एम.पी.एस.सी परीक्षा तारीख पुढे का ढकलली गेली ?

Corona च्या  प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. कोरोना चा धोका वाढत आहे.

मुंबईमध्ये कोरोना ची रोजची रुग्णसंख्या साधारणतः ३०० ते ३५० पर्यंत खाली आली होती किंबहुना राज्यामध्ये २०००-३००० पर्यंत खाली आली होती.

ती रुग्णसंख्या पुन्हा १२०००-१३००० ने पुन्हा दररोज वाढत आहे.

शहरे व ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे.

त्यांनी सांगितलं कि सगळं MPSC परीक्षा नियोजनासाठी आवश्यक असणारी शासकीय यंत्रणा, स्टाफ हा सध्या कोरोना च्या मागे लावला आहे. त्यामुळे गैरसोय झाली आहे,

म्हणजे – संसर्ग किती जणांना झाला आहे,

एकदा रुग्ण आढळला तर त्याला ट्रॅकिंग, ट्रेसिंग, लसीकरण, संसर्ग झालेली व्यक्ती किती लोकांच्या संपर्कात आली होती ,

मग त्या लोकांना शोधून काढणे, त्यांना गरज असेल तर त्यांना होम कॉरोनटाईन होण्यास सांगणे. अश्या कामामध्ये स्टाफ गुंतला आहे.

या परीक्षेला संपूर्ण आवश्यक असणारी यंत्रणा ही सर्व शासकीय यंत्रणा असते, त्याच्यामध्ये काही महसूल कर्मचारी आले

व इतर हे कर्मचारी आले,

विद्यार्धी परीक्षेची बसण्याची सोय, व्यवस्था कशी आहे , पेपर वाटणे, सुपरव्हिजन करणे, पेपर जमा करणे, पेपर गठ्ठे बांधणे.

अशा कामासाठी लागणाऱ्या कर्मचारी वर्गाची २-३ दिवसात १४ तारखेपर्यंत तयारी करावी लागणार आहे.

वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे जो कर्मचारी विद्यार्थ्यासोबत असेल त्या कर्मचारी वर्गाची कोरोना टेस्ट दिली गेलेली असणे गरजेचे. व कोरोना निगेटिव्ह असला पाहिजे.

कर्मचारी वर्ग हा व्हॅक्सिन घेतलेला असेल अश्या कर्मचाऱ्यांना परीक्षा नियोजनयासाठी दिला जावा अशी सूचना मुख्यामंत्र्यांनी दिल्या.

CM Udhhav Thackeray Facebook लाईव्ह येऊन जनतेशी संवाद साधला.

कोरोना आणि लॉकडाऊन बाबत

राज्यामध्ये दररोज कोरोना चा आकडा वाढत आहे , राज्याचा आकडा हा दरदिवसा १२०००-१३००० ने वाढत आहे. कोरोनाची वाढ शहर व ग्रामीण भागात दोन्हीकडे होत आहे.

मोठ्याप्रमात लसीकरण सुरु केले आहे. बरेचजण टेस्ट करून घ्यायला नकार देत आहे व टाळत आहे, सर्वानी टेस्ट करा .

कारण एकादी व्यक्ती जरी कोरोना पॉसिटीव्ह असेल त्यामुळे कुटुंबातल्या इतर व्यक्तींनाही कोरोना होऊ शकतो, त्यामुळे टेस्ट करा.

तर आता होम कोरोनटाईन सुद्धा देण्यात आली आहे.  

ठिकठिकाणी कोरोना वाढत आहे, त्यामुळे काही क्षेत्रांना लॉकडाऊन करावा लागणार आहे.

जिल्हा, तालुका ठिकाणी लॉकडाऊन करतं असताना शासनाशी चर्चा करावी लागणार आहे.

पहिल्या कोरोना लाटेच्या वेळी आपल्याकडे रुग्णशय्या नव्हत्या, PPE किट, व्हेंटिलेटेर , M95  मास्क नव्हते, औषधें तर आताही नाहीत, डॉक्टर परिचारिका कमी पडत होते.

पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती होऊ द्यायची नाही.

कारण दुसरी लाट हि सर्वत्र मोठी आलेली आहे.

त्यामुळे सर्वानी सुरक्षित रहा. त्रिसूत्री पाळा व अनावश्यक गर्दी टाळा.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: