मास्क घाला, लॉकडाउन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)

मास्क घाला, लॉकडाउन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)

महाराष्ट्र सेना ऑनलाईन| कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक च्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधला.

कोरोना चा पार्श्वभूमीवर वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी यामधून सूचना दिल्या.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह विदर्भातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

मागच्या काही दिवसात कोरोना ने पुन्हा एकदा आपला डोकं वर काढला , राज्यात आणि देशात खूप मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढू लागले.

कोरोना च्या या भीतीमुळे राज्यात पुन्हा एकदा लॉक डाउन होतो कि काय ? या साठी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह येऊन संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी व्यक्त केले की ” मधल्या काही काळात आपण शिथिल झालो अन कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला.

व्यवसाय, लग्न समारंभ, गर्दी ची ठिकाणे येथे सुरक्षितेचे नियम याकडे दुर्लक्ष झाले. हॉटेल , रेस्टोरेंट, दुकानांचे वेळ वाढवला, मंदिरे चालू केली.

सर्वसामान्य जनतेसाठी मुंबई मध्ये लोकल चालू केली.

या नंतर आपल्याकडून अपेक्षा होती आणि आहे कि कोरोना मध्ये शिस्थ व सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

पाश्चिमात्य देशामध्ये शिथिलता आपल्या सारखी अनुभवली आन तिथे आता लॉक डाउन आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडायची तर संपर्क थांबवणे हाच त्यावर एक मोठा उपाय. असे त्यांनी व्यक्त केले.

राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा वेग धरताना कोरोना पण वाढू लागला. अर्थचक्र ही आपल्याला चालवायचा आहे.

कोरोना व्हॅक्सिन आले असले तरी पूर्णपणे निदान झाले नाही, परंतु कोरोना सोबत आपल्याकडे युद्धात तलवार नसली तरी ढाल आहे. ते म्हणजे मास्क. आपण ढालेचा वापर करायचा आहे.

मास्कचा सर्वानी वापर करा, वेळोवेळी हात धुवा व सुरक्षित आंतर ठेवा.

हे तीन नियम पाळले तर कोरोना ला आपण रोखू शकतो. पुढच्या येणाऱ्या आठ दिवसामध्ये मी लॉकडाउन करायचा कि नाही हे पाहणार .”

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: