Bharat Band 26 March: संयुक्त किसान मोर्चा ने केला भारत बंद चे आव्हान

Bharat Band 26 march : संयुक्त किसान मोर्चा ने केला भारत बंद चे आव्हान, काय चालू असेल आणि काय बंद राहील हे जाणून घ्या

दिल्ली : Bharat Band 26  march – संयुक्त किसान मोर्चाने केला भारत बंद चे आव्हान , काय चालू असेल आणि काय बंद राहील हे जाणून घ्या.

कृषी कायदा विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेने शुक्रवारी, (२६ मार्च २०२१ ) ला भारत बंद ची घोषणा केली आहे.

संयुक्त किसान मोर्चानुसार शेतकरी आंदोलनाला ४ महिने पूर्ण होत असताना भारत बंद करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर २०२० पासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले होते .

२६ मार्च रोजी भारत बंद चे आव्हान ( Bharat Band 26 march)

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायदा च्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी मोर्चाने आंदोलन सुरू केले आहे.

न्यूज एजेंसी पीटीआय ने दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च २०२१ रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भारत बंद ची घोषणा केली आहे.

‘अन्नदाता’च्या सन्मानासाठी आवाहन करण्यात आले आहे.

होणारा भारत बंद यशस्वी व्हावा आणि त्यांच्या ‘अन्नदाता ‘चा आदर करावा, असे आव्हान आम्ही देशातील जनतेला करतो,’ २६ मार्च रोजी तीन कृषी कायद्यांविरुद्धचा आमचा मोर्चाला ४ महिने पूर्ण होईल.

असे शेतकरी नेते बुटा सिंह बुर्जगिल यांनी सांगितले. सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत हे शांततापूर्ण बंद लागू होतील, असे ते म्हणाले.

होळीमध्ये टाकल्या जाणार कृषी कायद्यांच्या प्रती

२८ मार्च ला होळी मध्ये नव्या कृषी कायद्याच्या प्रती टाकल्या जातील, असेही शेतकरी नेत्यांनी सांगितले.

भारत बंद बाबत भारत किसान युनियनचे (BKU) अध्यक्ष राकेश टिकैत म्हणाले की, या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मध्ये कोणतीही फूट पडणार नाही.

शेतकऱ्यांना दिल्लीला जाऊन पुन्हा अडथळे तोडावे लागतील, असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे, दिल्लीच्या सीमेवरील कृषी कायद्याच्या विरोधात मोठ्या संख्येने शेतकरी निदर्शने करत आहेत.

२६ नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात झाली होती

जयपूर येथे एका जाहीर सभेमध्ये संबोधित करताना टिकैत म्हणाले की , “त्यांनी (केंद्र सरकारने ) जात आणि धर्माच्या आधारावर आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले.

तुम्हाला आव्हान केल्यांनतर पुन्हा दिल्लीला जाऊन अडथळे तोडावे लागतील,” तुम्हाला सांगतो कि गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले.

शेतकरी संघटनांनी सांगितले की, आपत्कालीन सेवा सुरू राहतील .

दुकाने व व्यापारिक प्रतिष्ठान बंद राहतील, लोकांना स्व: इच्छेने दुकाने बंद ठेवण्याचे सांगण्यात आले,

रस्ते बंद नाही केले जाणार, फॅक्टरी व कंपन्या चालू राहतील, पेट्रोल पम्प, मेडिकल स्टोअर , जनरल स्टोअर, पुस्तकांची दुकाने चालू राहतील.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: