Aurangabad lockdown: औरंगाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन

Aurangabad lockdown: औरंगाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन

औरंगाबाद :औरंगाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक ३० मार्च २०२१ ते ८ एप्रिल २०२१ दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन (Aurangabad lockdown) राहणार.

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसानुदिवस वाढत चालली आहे.

वाढत्या रुग्णसंख्ये बरोबरच मुत्यूचे प्रमाण सुद्धा वाढत असल्याने कारणाने ,

औरंगाबाद जिल्याचे जिल्हाधीकारी श्री. सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील परिस्तिथी गंभीर होत चालली असल्याने दिनांक. ३० मार्च ते ८ एप्रिल २०२१ या दरम्यान कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

शहरी भागात तसेच इतर तालुक्यामध्ये रोग प्रतिबंधक नियम लागू केले गेले होते तेथे परिस्तिथी आटोक्यात येऊ शकली नाही.

वाढत्या कोरोना (Corona ) रोग संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाणे आता ठोस पाऊले उचलायला सुरु केली आहेत. येत्या ३० मार्च पासून ते ८ एप्रिल पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात कडक लॉकडाऊन (Lockdown)असेल व त्यामुळे येथील व्यवहार संपूर्णपणे बंद राहतील.

३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल, असे जिल्हाधीकाऱ्यांनी सांगितले आहे .

मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे १७०० नवीन कॉविड केसेसचा अहवाल येत आहे.

महाराष्ट्रामधील औरंगाबाद जिल्यात आतापर्यंत ७०,५२२ कोरोना रुग्णसंख्या झाली, त्यामध्ये १ ,३१८ लोकांचा मृत्यू झाला व ५५ ,१०३ लोक रीकव्हर झाली आहेत.

या व्यतिरिक्त शुक्रवार मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्यात राज्यव्यापी रात्रीचा कर्फ्यू लागू केला गेला आहे.

२७ मार्च, शुक्रवार रोजी जाहीर करण्यात आलेल्या रात्रीच्या कर्फ्यूमध्ये सर्व मॉल्स, सिनेमा हॉल, समुद्रकिनारे, सिनेमा हॉल, गार्डन

( सार्वजनिक ठिकाणे ) इत्यादी रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत बंद राहतील.

तर शुक्रवार मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्यात सर्व प्रकारच्या सार्वजनिक सभांवर बंदी चे नियम दिले गेले आहेत.

या नियमांचे कोणीही उल्लंघन केल्याचे आढळले तर त्या व्यक्तीस रुपये १००० दंड आकारला जाईल. असे प्रशासनाने म्हटले आहे

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: