अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती आयोजित युवा सन्मान सोहळा Shivamhotsav

अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती आयोजित ‘युवा शिव-सन्मान गौरव’ पुरस्कार-(Shivamhotsav)

लाल महाल, पुणे | शिवजन्मोत्सव’ Shivamhotsav -दि.१६ फेब्रुवारी’२०२१

दिनांक १६ फेब्रुवारी २०२१, या दिवशी पुण्यातील लालमहाल येथे ” अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती आयोजित ‘युवा शिव-सन्मान गौरव'” सोहळा पार पडला.

●◆●◆●◆●◆●◆●◆●

या सोहळाल्या पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ उपस्थित होते, व त्यांच्याहस्ते तरुणांचा सन्मान करण्यात आला.

समाजाला दिशा देणार काम तरुणाई कडून अपेक्षित-मुरलीधर मोहोळ महापौर

महापौर. मुरलीधर मोहोळ

शिवमहोत्सव (Shivamhotsav ) सोहळ्यात महापौर. मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले की ,

उद्याचं चांगलं भवितव्य घडवायचं असेल तर समाजात चांगलं काम करणाऱ्या तरुणांच्या पाठीवर थाप टाकण्याच काम झालं पाहिजे हे आज या पुरस्काराच्या रुपांन होतोय हे विशेष आहे.

आपल्या राजाच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाच स्मरण आणि त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम अविरत पणे सुरू राहावे असे प्रतिपादन

-महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

पुणे येथे झालेल्या युवा सन्मान सोहळ्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त

येसन” या पुस्तकाचे लेखक श्री. ज्ञानेश्वर जाधवर,

वीरगळ आणि सतीशीळा” पुस्तकाचे लेखक श्री. अनिल दुधाने,

प्रतिपश्र्चंद्र ” या पुस्तकाचे लेखक डॉ.प्रकाश सूर्यकांत कोयाडे,

शिरसवाडी” या पुस्तकाचे लेखक श्री. गणेश बर्गे,

स्वराज्याचे चलन, पश्चिमी क्षात्रपांची नाणी, नाणी संग्राहक” लेखक श्री. आशुतोष पाटील,

पराक्रमा पलीकडले शिवराय” लेखक श्री. प्रशांत लवटे पाटील,

फिरस्ते, काहून” पुस्तकाचे लेखक श्री. अभिषेक कुंभार,

सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरे” पुस्तकाचे लेखक श्री. रवी पार्वती शिवाजी मोरे,

पुणे ते पानिपत सायकल मोहीम यशस्वी करून इतिहासाला उजळणी देणाऱ्या मराठा वोरीयर्सचा सन्मान करण्यात आला.

शिवमहोत्सव सोहळ्यात पुणे मनपा उपायुक्त श्री. माधव जगताप, महाराष्ट्र विदुयत महामंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, पुणे मनपा सहायक आयुक्त श्री. संदीप कदम, समितीचे अध्यक्ष श्री. विकास पासलकर, श्री. प्रशांत धुमाळ, श्री. विराज तावरे, श्री. कैलास वडघुले, श्री. संतोष शिंदे उपस्थिती होते.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: