अभिनेता प्रकाश राज (Prakash raaj) यांनी वाढत्या गॅस किमतींमुळे केंद्र सरकार वर साधला निशाणा

अभिनेता प्रकाश राज (Prakash raaj) यांनी वाढत्या गॅस किमतींमुळे केंद्र सरकार वर साधला निशाणा

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : अभिनेता प्रकाश राज (Prakash raaj) यांनी वाढत्या गॅस किमतीं मुळे केंद्र सरकार वर साधला निशाणा.

त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून मागील तीन महिन्यामध्ये गॅस ची किंमत किती वाढत गेली हे सांगितले व केंद्र सरकार वर टीका केली.

दिवसानुदिवस महागाई वाढत चालली आहे. घरगुती गॅस , डिझेल व पेट्रोल, इतर काही वस्तूंच्या किमती वाढत आहे .

वाढत्या महागाई मुळे सर्वसामान्य जनतेला आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत चालले आहे.

देशामधील महागाई झपाट्याने वाढत आहे आणि त्यावर नियंत्रण करण्यात सरकार अपयशी ठरत आहे.

” मागील तीन महिन्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडर ची किंमत ही २२५ रुपयांनी वाढली आहे.” असं ट्विट केला , व केंद्र सरकार वर निशाणा साधला.

दिनांक १ डिसेंबर २०२० घरगुती गॅस ची किंमत ५० रूपांनी वाढली,

१ जानेवारी २०२१ ला किंमत पुन्हा ५० रूपांनी वाढवली गेली .

४ फेब्रुवारी २०२१. मध्ये २५ रुपयांनी तर १६ फेब्रुवारी ला ५० रुपये किंमत वाढवली , अखेर २५ फेब्रुवारी ला पुन्हा २५ रुपयांनी गॅस किंमत वाढली .

१ मार्च २०२१ ला किंमत २५ रुपयांनी वाढवली गेली.

मुंबई मध्ये घरगुती गॅस सिलेंडर चा दर हा ८१९ रुपये झाला आहे.

तर दिल्लीमध्ये सुद्धा ७९४ रुपयांवरून ८१९ रु, दर वाढ झाली.

चेन्नई मध्ये ८३५ रुपये .

कोलकत्ता ८४५.५० रुपये घरगुती गॅस सिलेंडर मध्ये दर वाढ झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: